विद्यार्थ्यांचा घवघवीत यशाने शाळेचे नाव उज्ज्वल
डॉ सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर – सेंट जॉन मिशन माइनॉरिटी इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तुमसर यांनी यावर्षीही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालान्त परीक्षा (SSC बोर्ड परीक्षा) 2025 मध्ये १००% निकाल मिळवून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.
या वर्षी एकूण ४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये
१७ विद्यार्थी विशेष प्राविण्य (Distinction)
१५ विद्यार्थी प्रथम श्रेणी
१२ विद्यार्थी द्वितीय श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाले.
शाळेतील टॉपर्स:
वैष्णवी धुर्वे – ९५.२०% (प्रथम क्रमांक)
रितिका बुधे – ९३.४०% (द्वितीय क्रमांक)
मास्तर अथर्व वासनिक – ९१% (तृतीय क्रमांक)
कसावरी अथिलकर – ९०.४०% (चतुर्थ क्रमांक)
या उज्ज्वल यशाचा उत्सव शाळेत आयोजित विशेष समारंभात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फुलांचे स्वागत व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मीरा भट (बाल व महिला कल्याण समिती अध्यक्ष, तुमसर), रेनू गिडीयन (शाळा संस्थेच्या अध्यक्षा), जॉन्सन गिडीयन (शाळा संस्थेचे सचिव) उपस्थित होते.
कार्यक्रमात शाळेचे शिक्षक माया कटरे, वैशाली पटले, देविका भट, आचल मेश्राम, पूनम पटले, प्रतिक्षा काळे आणि शुभांगी घोडिचोर – यांनाही विद्यार्थियाचा अभिवादन व सत्कार केला.
शाळेचे मुख्याध्यापक अनुप गिडीयन यांनी सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. त्यांनी आपल्या संदेशात सांगितले की,
“१९९९ सालापासून कार्यरत असलेली ही संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास कटिबद्ध असून, समाजासाठी उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांची घडण हेच आमचे ध्येय आहे.”
या यशामुळे संपूर्ण तुमसर परिसरात शाळेचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जात आहे.

