प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – छत्रपती संभाजी नगर (दि ७ मे): मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने दि. ७ मे २०२५ रोजी ‘भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह’ छत्रपती संभाजीनगर येथे ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन समारंभ व काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या भव्य प्रकाशन समारंभात विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली रायपुरे, सहारे यांच्या ‘सोनप्रहर’ या ललित संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. सोबतच मुख्य संपादक राहुल पाटील यांनी काढलेल्या ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
सोनाली सहारे यांचा काव्यवाचन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक आला त्यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे हे मराठी शिलेदार समूहातर्फे काढण्यात आलेले पाचवे पुस्तक आहे. यापूर्वी भावस्पर्श, काव्यसृष्टी, मनतरंग ,सूर्य विचार सोनशिल्प सूविचार संग्रह प्रकाशित झाले आहेत.तसेच आता सोनप्रहर हा ललित संग्रह प्रकाशित झाला.
याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यरुचक आमदार मा.विक्रम काळे, उद्घाटक व मुख्य आयोजक डॉ. पद्या जाधव
आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, विशेषांकाच्या प्रती व पुष्पगुच्छ देऊन कौटुंबिक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुटुंबातील सिध्दार्थ भाऊरावजी सहारे उपस्थित होते.सासूबाई शिलाबाई भाऊरावजी सहारे,आई बाबा अर्चना मारोतराव रायपुरे, गडचिरोली, मुले साची, सम्राट, बहिण मोनाली परमेश्वर दुर्गे, लीना राहुल रायपुरे, जिया, अभीधम्म, शर्लिन यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राज्यातील व राज्याबाहेरील मराठी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आई बाबा डॉ. एम. ए. रायपुरे व अर्चना रायपुरे , प्रा.नानाजी रामटेके,आरमोरी जिल्हा गडचिरोली तसेच नातेवाईक मित्रपरिवार सर्वांनी खूप अभिनंदन केले.

