
दत्तात्रय घुले धामोरी प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील महत्वपूर्ण समजले जाणारे धामोरी येथील बाजारपेठ असलेल्या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून येथील स्ट्रिटलाईट विद्युत पुरवठा बंद अवस्थेत दिसुन येत आहे.
सध्या धामोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयकामी प्रशासकीय अधिकारी यांची नेमणूक असुन त्यांचेही या दोन दिवसांपासून स्ट्रिटलाईट विद्युत पुरवठा बंद असल्याने लक्ष दिले जात नाही. ही खंत असल्याने येथील व्यावसायीक , ग्रामस्थ व नागरिकांमधून चर्चेचा विषय होत आहे.
तरी संबंधित वरीष्ठ ग्रामपंचायत विकास अधिकारी यांनी याकडे लक्ष देवुन या स्ट्रिटलाईट विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.















