ज्योती हंगे संभाजी नगर प्रतिनिधी – भारतीय सैनिकांनी “ऑपरेशन सिंदूर” विजयाच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा सन्मान दर्शवण्यासाठी आज वैजापुर तालुका माध्यमातून शहरात “भव्य तिरंगा रॅली” व “ऑपरेशन सिंदूर” आयोजित करण्यात आली.
रॅली मार्ग ठक्कर बाजार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संकट मोचन हनुमान मंदीर महात्मा जोतिबा फुले स्मारक अहिल्याबाई होळकर स्मारक महाराणा प्रताप स्मारक पंचायत समिती समोर समारोप करण्यात आला.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेऊन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्या विजयाच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा सन्मान दर्शवण्यासाठी व भारतीय सैन्याने मनोबल वाढविण्यासाठी “भव्य तिरंगा रॅली” काढण्यात आली.
या रॅलीस कार्यसम्राट आमदार.प्रा.रमेश.पा.बोरनारे यांनी उपस्थित राहून भारतीय सैन्याच्या या शौर्याबद्दल यावेळी त्यांचे अभिनंदन केले. ‘वंदे मातरम’ ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत “राष्ट्रप्रेम आणि संस्कृतीचा संगम हीच सिंदूर यात्रा” सांगत सर्व भारतीय नागरिक सैनिकांच्या पाठीशी असल्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. यावेळी माजी सैनिक व शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा यांचा सन्मान करण्यात आला.
या राष्ट्रीय एकतेच्या आणि सांस्कृतिक अभिमानाच्या रॅलीमध्ये जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, वारकरी, माजी सैनिक, सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

