prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – पर्यावरण...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – पर्यावरण संतुलनाकरीता

0
124

निसर्गाच्या सान्निध्यात हवे जायला
तुटण्यापासून झाडांना हवे वाचवायला.
कुणी घरे बांधण्यासाठी तर,
कुणी रस्त्यांसाठी कापतात झाडांना.

झाडांच्या पंचांगांचा उपयोग आपल्याला,
पाने,फुले,फांद्या, फळे, मुळे यांचा,
करतो वापर अनेक तर्‍हेने जगताना,
माणसाच्या जीवनाचा महत्वाचा घटक हा.

घरांसाठी लाकूड वापरून,
चिक, सालही माणूस घेतो काढून.
बरेच उद्योग धंदे चालती झाडांवर,
झाडांचे उपकार माणसाने घ्यावेत मानून.

श्वासांकरीता, पर्यावरण संतुलनाकरीता,
मातीचाही कस राखण्याकरिता,
अवलंबून माणूस झाडांवर हा,
पर्जन्यासाठीही ऋणी असे झाडांचा.

नसतील झाडे तर जगू कसे हे,
विचार करून, निसर्गास वाचूया रे.
प्रत्येकाने एक तरी झाड जमिनीत लावून,
त्याचे संवर्धन करून वाढवू चला रे.

संत तुकारामांचा अभंग आठवतो मज,
‘वृक्षवल्ली आंम्हा सोयरी….’आहे सार्थ,
आपले झाडांशी प्रेमाने देण्या घेण्याचे सख्य,
जपत राहून एकमेकां करूया सहाय्य.

डाॅ. सौ. स्मिता एस. मुकणे.
ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here