
उठ जागा हो मानवा
पर्यावरण संरक्षणा
समजुन घे निसर्ग कायदा
या पर्यावरण दिना
सर्व सृष्टीची एक
साखळी रे असते
पर्यावरणाचा र्हास जास्त
झाला रे तुझ्या हस्ते
वनराईच्या जागी
डोंगरे सिमेंटची
घरे शोधण्या चालली
भटकंती प्राण्यांची
तापमानाचा रोजचाच
आकडा वाढता
त्रास देणे निसर्गा
सोड तरी आता
हवा,जल,पाणी
प्रदुषीत सारे
हरवताना तुला
बघवेना पावसा रे
नको होऊ स्वार्थी
समजुन घे जबाबदारी
टाळण्या अनर्थ असले
मानवा झाड लाव दारी
मग बघ सृष्टी कशी
नटणार हिरवाईने
तुला आणि इतरांनाही
जगता येईल आनंदाने
अनिता कांबळे
यवतमाळ















