prabodhini news logo
Home कोपरगाव नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण व संरक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले वृक्ष...

नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण व संरक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले वृक्ष लागवड

0
168

नवनाथ उल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी 7744022677 – कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले वृक्षरोपण लागवड. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षरोपण करणे फार गरजेचे आहे. फक्त वृक्षरोपण करून भागणार नाही तर वृक्षाचे संरक्षण व संवर्धन करणे हे काळाची गरज झालेली आहे. अन्यथा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम भोगावे लागतील असं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे चास नळी येथील माय भूमी फाउंडेशनचे कार्यकारी मंडळ यांनी श्रीराम सृष्टी परिसरात 20 एकर वावरामध्ये वड वृक्ष लावण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. या वृक्षरोपण कार्यक्रमासाठी गावकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.वृक्ष रोपणाची जबाबदारी आपल्या पुढील पिढीनेही ती सांभाळावी व त्याची आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने मायभूमी फाउंडेशन मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. अनेक वर्षापासून पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षरोपणातून योगदान देत आहेत. वृक्षरोपण हे एक औपचारिक कार्यक्रम न मानता त्याला समाज प्रबोधनाचे व्रत मानले असून नवीन पिढीमध्ये निसर्गप्रेम रुजावे त्यासाठी ते प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here