prabodhini news logo
Home घुग्घुस नागसेन बुरचुंडे परिवारा तर्फे नवीन पंचशील बौद्ध विहार बांधकाम पंचवीस हजार रुपये...

नागसेन बुरचुंडे परिवारा तर्फे नवीन पंचशील बौद्ध विहार बांधकाम पंचवीस हजार रुपये दान

0
285

सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज – घुग्घुस – आज दिनांक 10/06/2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस पंचशील बौद्ध विहाराचे नवनवीत बांधकाम सुरू आहे.
नागसेन ऋषी बुरचुंडे, कृतिका नागसेन बुरचुंडे, संगीता चंद्रसेन बुरचुंडे, विकास चंद्रसेन बुरचुंडे, धनश्री चंद्रसेन बुरचुंडे यांनी आपल्या आई स्मृतीषेश विमलबाई ऋषी बुरचुंडे त्यांच्या प्रीत्यर्थ पंचवीस हजार रुपये (25000) दान दिले.
भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे यांनी एक संकल्पना आखली की वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, तिसरा दिवस न करता तो पैसा समाजाला दान करा जणे करुन तो पैसा योग्य ठिकाणी लावुन समाज घडविण्याचे काम होईल.

नवनवीत पंचशील बौद्ध विहाराचे बांधकाम हे लोक वर्गणीतून होत असल्याने बौद्ध बांधवांनी हि संकल्पना लक्षात घेऊन वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, तिसरा दिवस साजरा न करता विहार बांधकाम दान देत आहे.

भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी नागसेन ऋषी बुरचुंडे, कृतिका नागसेन बुरचुंडे, संगीता चंद्रसेन बुरचुंडे, विकास चंद्रसेन बुरचुंडे, धनश्री चंद्रसेन बुरचुंडे यांचे आभार मानले.

यावेळेस कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, माया सांड्रावार केंद्रीय शिक्षिका यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिता देशकर, सल्लागार संभाजी पाटील, सोहम पाटील, जितेंद्र साठे व समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here