prabodhini news logo
Home इंदापूर प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पहिला पाऊस

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पहिला पाऊस

0
155

येता पाऊस पाऊस…
होते तुझी आठवण….
कधी येशील सख्या रे…
वाट तुझी मी पहात…

पाहिली स्वप्न किती…
कधी होतील ती पूर्ण…
ये ना तू परतुनी ……
वाट तुझी मी पहात….

भिजू दोघेही आपण ….
नको कुणीही सोबत…
देती हाक तुला मला
बघ आकाशीचे मेघ….

दरवळे अंगणी तो….
मोगरा….मोगरा…
होई वेड मन माझं
असा सुवास सुवास….

येता जवळी असा तू…
वर खाली होई उर
होई जीव बघ माझा
कसा कातर कातर…

असा हा पाऊस…
अन् होई तू अनावर…
होई भेट मग अशी …
देहावर उठे नक्षी….

आशालता भोसले इंदापूर, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here