prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वटसावित्री पौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वटसावित्री पौर्णिमा

0
226

पतिराजास लाभावे दिर्घायुष्य
त्यांचे आरोग्य रहावे नीट.
जगताना जीवन न व्हावा त्रास
न यावे प्रसंग जीवावर त्यांच्या बिकट.

जसे सावित्रीने सत्यवानाकरीता
यमापाशी करून विनवणी खूप
मागितले आयुष्य पतिस ,वर मागताना
जीवनसाथी तो जगावयास करूनी व्रत_जप.

वटसावित्री पौर्णिमेचे हे व्रत
सकारात्मकता आणते स्रियांच्या मनात.
जोडीदार जीवनाचा कायम हवा सोबतीस
साथ मोलाची त्याची हवीच जगण्यास.

वटवृक्षास वट पौर्णिमेच्या दिनास
फिरून सात फेरे आस्थेने धागा बांधत
करते विवाहिता पूजन त्याचे, ठेवून विश्वास
यम राजास हात जोडून, संसार ठेव सुखात म्हणत.

सात जन्म सप्तपदी चालेन
सुख दुःख सोबत साहीन.
संसाराची आंम्ही चाके दोन
टिकून राहो सौभाग्य लेणं, हेच मागणं.

डाॅ. सौ.स्मिता एस. मुकणे, ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here