प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वटसावित्री पौर्णिमा

0
52

जिने मृत्युला जिंकले
होती सावित्री महान
वटपौर्णिमेच्या दिनी
दिले पती जीवदान १

वटसावित्री पौर्णिमा
पूजा वडाच्या वृक्षाची
मागे नारी वाढो दोरी
पतीराज आयुष्याची २

सौभाग्याचे वाणं देई
सुवासिनी स्त्रीच्या हाता
पाच फळे देवूनिया
होई पूजेची सांगता ३

वटसावित्री पौर्णिमा
उपवास पतीसाठी
सावित्रीचे आत्मबळ
सुखी संसाराच्या साठी ४

वटसावित्री पौर्णिमा
सुवासिंच्या आनंदाचा
सावित्रीचे मनोधैर्य
लढा जिंके अस्तित्वाचा ५

यमराजा हरविले
दाखलातो पावित्र्याचा
वट सावित्री पूजेने
वसा घेऊ सामर्थ्याचा ६

डाॅ. सौ.रेखा पौडवाल, गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here