जेष्ठ मासाची पौर्णिमा
दिन वटसावित्रीचा
वटवृक्ष पुजन्याचा
सण सौभाग्यवतीचा..१
द्यावे सौभाग्य आरोग्य
विष्णूदेवा विनविती
वड देती प्राणवायु
प्राणीमात्र जगविती..२
आंबा जांबूळ फणस
गहू वाण हे ओटीचे
एकमेका बांधितात
मऊ सूत हळदीचे..३
मुले खेळती पारंब्या
होई कसरत छान
झाडे लावा नि जगवा
वटवृक्ष मौल्यवान..४
जन्मोजन्मी हाच पती
देणं दिर्घायुष्य आयुष्याचे
सुख समृध्दिच्या हिता
सात फेरे सौभाग्याचे..५
सौ. रेखा मालपुरे, कल्याण

