prabodhini news logo
Home चंद्रपूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळाकडून विमान अपघातात म्रुतात्म्यांना श्रद्धांजली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळाकडून विमान अपघातात म्रुतात्म्यांना श्रद्धांजली

0
184

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – दिनांक १२ जुन २०२५ ला विमान अपघातात म्रुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.हा कार्यक्रम वंदना विनोद बरडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महीला मंडळ समिती मार्फत घेण्यात आला.विमान अपघातातिल म्रुतात्म्यांना शांती मिळो व त्यांच्या घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहोत अशी प्रार्थना करण्यात आली.सामाजीक बांधीलकी म्हणून आणि समाजाप्रती आपले काहीतरी देणें असतें त्यांची जाणीव ठेवून व त्याची जनजागृती करुन प्रचार व प्रसार करणे हा मंडळाचा उद्देश.या कार्यक्रमासाठी वंदना विनोद बरडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष, संजिवनी घुरडे कोषाध्यक्ष, मिनाक्षी लोही कार्याध्यक्ष,शालीनी कसरे,सूप्रीया गाजरे, लता लोही,सुरेखा ढवळे,अनीता त्रिकुट,निशा त्रिकुट,कामीनी तवले,स्मिता तांबडे व ईतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या.हा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सौभाग्य नगर नागपूर येथे घेण्यात आला.त्यांच्या नांवे एक एक झाडं व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवा नीमीत्य पण एक झाड प्रत्येकीने लावण्याचा संकल्प करण्यात आला
आणि म्रुतात्म्यांना २ मीनीट श्रद्धांजली अर्पण करून जिवनाचा बोध घेऊन जिवन आनंदाने जगावे कारण जिवन हे आता क्षणभंगुर वाटायला लागले म्हणून जो दिवस,जो क्षण येईल तो आनंदात घालवा व स्वतः आनंदी राहुन दुसऱ्यांना पण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here