रेव्हेन्यू तिकिटांचा तुटवडा — नागरिक हैराण, जिल्हा मुख्य कार्यालयात पाठपुरावा करूनही उपाय नाही

0
36

रेव्हेन्यू तिकिटांचा दुष्काळ; कामाच्या अडचणींनी नागरिक हैराण!

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ब्रम्हपुरी तालुका उप पोस्ट कार्यालयात रेव्हेन्यू तिकिटांचा सध्या तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा मुख्य कार्यालयात तिकिटे मागविण्याची मागणी करण्यात आली असली तरी, अद्यापपर्यंत तालुका उप पोस्ट कार्यालयात स्तरावर तिकिटांचा पुरवठा झालेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसमध्येही तिकिटे उपलब्ध नाहीत, परिणामी नागरिकांना आवश्यक कामांसाठी अडथळा येत आहे.

FD (फिक्स डिपॉझिट) करणे, विड्रॉव्हल प्रक्रिया, शासकीय व खाजगी व्यवहारांमध्ये रेव्हेन्यू तिकिटे अनिवार्य असतात. मात्र, तिकिटांचा तुटवडा असल्याने हे व्यवहार रखडत असून नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे.
उप पोस्ट कार्यालयात याबाबत चौकशी केली असता, जिल्हा मुख्य कार्यालयात तिकिटांची मागणी करण्यात आली आहे मात्र अद्यापपर्यंत पूर्तता झालेली नाही, असे उत्तर मिळाले.

नागरिकांतून संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ रेव्हेन्यू तिकिटांचा पुरवठा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. तिकिटांचा अभाव लवकरात लवकर दूर करून नागरिकांच्या अडचणी कमी करण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here