prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भेट तुझी माझी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भेट तुझी माझी

0
148

वर्षानु वर्ष उलटले तरी काही धूळ खाल्लेले आरशावर जसं धूळ बसलेली असते व ते पुसल्यानंतर स्पष्ट आपलाच तो चेहरा दिसत असतो त्याचप्रमाणे काही आठवणी मनात घर करून राहून जातात .आणि मग प्रसंगमय समयी अशा आठवणीचा पिटारा अवतीभवती फिरत असतो.

भेट होती ती अनोळखी जरी
कालांतराने वाटली आपुलकी
तुझ्या नयनचक्षुने आज सख्या
तुझ्या स्मिता हास्यातूनच राहिली बांधिलकी

जरी अबोली राहिली प्रीत
भेट तुझी माझी प्रीत सुमधुर
राहिली ना होते ते क्षणभंगुर
आठवणींच्या विचारांचा सप्तसूर

कधीच नाही झाल्या व्यक्त
तुझ्या भावनांच्या धारा
कळू नाही दिले तू मला
तुझ्यातल्या चांगुलपणाचा विचारा

भेट तुझी माझी जरी क्षणार्धाची
होती रोजच्या दिवसांनी व्यस्त
तुझ्या नयनांना प्रेमानेच केले
प्रत्येक क्षणी तू माझ्यात त्रस्त

जरी काळरूपाने केले दूर
तरी कोरीले मला तू हृदयात
मीच राहिले तुझ्या समीप संख्या
मीच राहिले तुझ्या प्रीतीत

रंजना भैसारे, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here