येता पावसाची सर
मृदगंध पसरतो
चिंब चिंब भिजवून
अंग अंग मोहरतो
ओल्या मातीचा सुवास
मृदगंध मितभाषी
रोमरोमी सामावून
एकरुप जीवनाशी
साहित्याच्या प्रांगणात
मृदगंध बहरतो
प्रतिभेला फुलवून
सुप्तगुण जागवतो
आंतरीक समाधान
मृदगंध जीवनाचा
आर्त हाक वेदनेची
ओघ वाहे भावनांचा
तुरे कर्तृत्व खोवत
मृदगंध दरवळे
गाठे शिखर यशाचे
चोहीकडे सुख मळे
सुख अत्तर शिंपडे
मृदगंध आत्मानंदी
ईश्वराच्या सानिध्यात
लागे टाळी ब्रम्हानंदी
डाॅ. सौ. रेखा पौडवाल, गोवा

