प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – विठु नामाचा गजर

0
208

पाठी विठुराया।चंदनाचा टीळा ॥
माऊलीचा लळा । विठु माझा ॥

अठ्ठावीस युगे । उभा विटेवरी ॥
कर कटेवरी । पांडुरंग ॥

चालती पावले । पंढरीची वाट ॥
पाही दिवे घाट। आनंदाने ॥

हाती टाळ-विणा । हरीचा गजर ॥
रुप मनोहर । विठ्ठलाचे॥

डोई रे तुळस । झेंडा आहे हाती ॥
पावले धावती । रिंगणात ॥

भक्त पुंडलिक । उभा किर्तनास ॥
कौतुक जनांस । हरी नाचे ॥

जन्मोजन्मी भक्त । चालतो पढंरी॥
वारकरी वारी। दास तुझा ॥

विठुच्या चरणी । दुःख विसरुन ॥
भान हरपुन । वारकरी ॥

स्थान पांडुरंगा । चरणांशी द्यावे ॥
सांभाळून घ्यावे । विठु मला ॥

विठुच्या चरणी । मस्तक ठेविले ॥
वैकुंठ पाहिले । चरणात ॥

अनंत जन्माचा । साजरा सोहळा ॥
देव माझा भोळा । विठुराया ॥

श्री. शुभम किरण गोरे
अकलूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here