
जगदीश वडजे
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी
“मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व आदर्श अभिनव बाल विकास मंदिर विद्यालयात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरी अर्थात पंढरपूर विठू माऊलीच्या जयघोषाने रिंगण सोहळ्याने अवतरले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ,पदमाकर दादा वडजे,नंदू भाऊ काळोगे, सुभाष वडजे त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापिका सविता शिंदे, पर्यवेक्षक नितीन भामरे, उत्तमदादा दिघे,दिलीप उफाडे (माऊली),वसंत उफाडे,जालिंदरभाऊ उफाडे,जगदीश वडजे,अमोल पडोळ, सनी उफाडे ज्ञानेश्वर सोनवणे विश्वासराव पडोळ ज्ञानेश्वर उफाडे आदी उपस्थित पालकांच्या हस्ते ज्ञानोबाच्या पालखीचे पूजन करण्यात आले,यावेळी वारकऱ्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसेच तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली यामुळे विद्यालय परिसरात प्रति पंढरपूर अवतरल्याचा भास निर्माण झाला होता.अभिनव बाल विकासचा इयत्ता :- 4 थी चा विद्यार्थी श्रीराज देशमुख याने विठुरायाची तर ईश्वरी भुसाळ यांनी रखुमाईची वेशभूषा करून कार्यक्रमाचे आकर्षण वाढवले.
याचबरोबर वरखेडा गावातील आदर्श व्यक्ती दिलीप (माऊली) उफाडे यांनी विठू माऊलीची भजने गाऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.गोल रिंगण करून सर्वांनी पालखीचे पूजन व शिक्षिका विद्यार्थीनी यांनी फुगड्या खेळून हा सोहळा मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पाडला.विठ्ठल विठ्ठल,चंद्रभागेच्या तिरी… या भक्तिमय गाण्यावर सर्वांनी ठेका धरला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता शिंदे मॅडम यांनी,”वारी म्हणजे आपल्या आयुष्याला मिळालेले एक वरदान आहे,त्यामुळे वारकरी संप्रदाय नेहमी आदर्श सुसंस्कृत आणि धार्मिक वाढविण्याचे कार्य करतो,म्हणून प्रत्येकाने पंढरपूरची वारी करावी. विद्यालयातील अशा उपक्रमाने नेहमीच प्रति पंढरपूरला आल्याचा भास आम्हाला होतो.असे आपल्या मनोगतातून सांगितले. वरखेडा गावातील हरी भक्त पारायण श्री.दिलीप (माऊली) उफाडे यांनी ‘वारकऱ्यांची पवित्र पंढरीची’ या विषयावर सखोलरीत्या मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन इयत्ता :- ९ वी क चे विद्यार्थी यांनी वर्गशिक्षिका श्रीम.अलका शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने उत्तम नियोजनबद्ध रित्या केले.विद्यालयात वारकरी दिंडी काढून भक्तिमय वातावरण निर्माण झाले गावातील उपस्थितांनी पालखीचे पूजन केले.कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितिका भोई, प्रियंका भुसाळ या विद्यार्थ्यांनी तर आभार उपशिक्षक संदेश संजय जाधव यांनी मानले.















