
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : आज दि. 10/7/2025 रोजी महाकाली कालरी परिसरातील प्रकाश नगर येथील विजपुरवठा वांरवार खंडीत होत असून सामान्य माणसाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता तसेच या परीसरातील विजेचे तार कमकुवत झाले असून अगदी खाली आले होते. यामुळे या तारांना स्पर्श होऊन जीवीतहानी सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे जनजीवन भयभीत झाले असून वारंवार खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे शालेय विद्यार्थी, छोटे व्यवसाहिक यांना याचा जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून सदर परीसरातील वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या नेहमी सुचना संबधीत विभागाला देण्यात आले.
नागरीकाना दिलासा द्यावा या करिता निवेदन दिनांक १६/०४/२०२५ ला मनसेचे रुग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता, जिल्हासचिव किशोर मडगुलवार तथा मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांच्या कडून निवेदन देण्यात आले होते. आज सदर कामाला सुरवात झाली असून मनसेच्या मागणीला यश आल्याने परीसरातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
मनसेचे रुग्णमित्र हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असुन वेळोवेळी समाजहिताचे कार्य करीत असतात या कार्याने त्यांचे परीसरातील नागरीकांकडून कौतूक केले जात आहे..
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे कुलदिप चंदनखेडे, मनविसे ता. उपाध्यक्ष प्रविन शेवते, राजु देवांगन, शंकर भड़के आणि मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.















