prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरु पौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरु पौर्णिमा

0
136

आषाढ मास पौर्णिमा
ऋषिपत्तन मृगदाय वना
पंचवर्गीय भिक्खूस धम्मदेशना
उपदेश धम्मचक्र प्रवर्तन दिना

साऱ्या विश्वाचे महागुरु
सम्यक सम्बुद्ध करुणाकर
जगाला दिला सदधम्म
त्रिरत्न कल्याणकारी सुखकर

श्री भगवान बुद्ध अर्हत
सत्याचा शोध लावी
संबोधी मिळवी प्रयत्ने
प्रज्ञेचा प्रकाश दावी

सुगत भगवान गौतम
अविरत चारीका करी
दुःखाचे कारण तृष्णा
तृष्णा संपवली सत्वरी

प्रज्ञा शील करुणेचा
अष्टांगमार्ग दश पारमि मैत्रीचा
प्राणिमात्राचे होई कल्याण
बुद्धाचा मार्ग दुःख मुक्तिचा .

डॉ. चंद्रशेखर नामदेव मुळे
कोल्हापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here