prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरु पौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरु पौर्णिमा

0
127

गुरु थोरवी किती वर्णावी
शब्दच अपुरे पडती
त्यांच्या आशिर्वादामुळेच
जीवनास मिळे यशोगती १

पहिले गुरु मायबाप हे
रुजवे संस्कारांचे मोती
दुसरे गुरु हे शिक्षक
विद्यादानाने करे प्रगती २

वृक्ष ही आहेत आमचे गुरु
जे केवळ देणेच जाणते
जरी फळांनी लडगडले
वाकून शालीनता दाखविते ३

सूर्य ही आपुला गुरु
जो प्रकाश सर्वत्र पसरवितो
ज्ञानाचा प्रकाश पसरावा
हे आम्हांला शिकवितो ४

चंद्राची कोर आम्हा
शितलता प्रदान करते
चंद्र ही आमुचा गुरु
होऊन संयमता शिकविते ५

मायबाप शिक्षक निसर्ग
गुरु असती आमुचे
गुरूपौर्णिमेला वंदन करुन
ऋण फेडू आम्ही तयांचे ६

डाॅ.सौ.रेखा पौडवाल
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here