prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरु पोर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरु पोर्णिमा

0
103

प्रथम आमचे । माय बाप गुरू
पूजा त्यांची करू।खरोखर ।।१।।

दुसरे वंदन । गुरूच्या चरणी
मन समाधानी ।होत असे ।।२।।

आम्हाला मिळते । गुरुमुळे ज्ञान
गुरू हे महान।।जगामध्ये ।।३।।

गुरुमुळे मार्ग । सुकर हे होतो
गुरू ज्ञान देतो।शिष्यगण ।।४।।

गुरू आहे ज्ञानी । जीवनी आधार
शिष्यांचा उद्धार।होत असे ।।५।।

गुरूच्या चरणी । टेकवीत माथा
थोर अशी कथा ऐका जरा ।।६।।

गुरुची ही वाणी । अमृताची धार
जगाचा उद्धार।केला त्यांनी ।।७।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here