prabodhini news logo
Home ठाणे प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – गुरुपौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – गुरुपौर्णिमा

0
116

आई-वडील, आजी – आजोबा, भावंड, नातेवाईक, समाज यांकडून वेळोवेळी बरंच शिकत आलो आणि शिकत असतो आपण हे ऋण शब्दांत व्यक्त करता येणं अशक्यच खरंतर. पण त्याची जाण असणं असतं महत्वाचं.
या सर्व मला घडवलेल्या व्यक्ती आभाळाएवढ्या मोठ्या आहेत.
त्यांना नमस्कार करून मी पुढचे लिहायला आता सुरूवात करते.

आज गुरुपौर्णिमा गुरू हेच माझ्या जीवन प्रवाहास आकार देत याला साकारत आले.

माझ्या आणि जगातील सर्व गुरूंना माझा स्राष्टांग नमस्कार.

गुरू…

कुठे अडलंय तुझं…..
बघू दे मला…..

त्या वर्गात म्हणाल्या मला.
त्यांचे ते शब्द, भिडले मनाला.
अन् पाहू लागले मी त्यांच्याकडे
डोळ्यांनी हृदयाच्या.

किती प्रेमळ, विश्वासार्ह ती
तळमळ त्यांची शिकवण्याची
विद्यार्थ्यांना शिक्षित करून
पुढे नेण्याची.

गुरू हेच, ज्ञानमंदिरात हात धरून नेणारा,
आत शिरण्या, विविध वाटा दाखवणारा.
सरस्वतीपुढे मस्तक झुकता,
ज्ञानाचा वसा मिळवून देणारा.
गुरू हेच जीवनात साक्षर बदल घडविता.

डाॅ. सौ. स्मिता एस. मुकणे
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here