
तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
अहेरी सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीतर्फे अहेरीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या अहेरी-वांगेपल्ली अॅप्रोच रस्त्याचे एका महिन्यापूर्वी खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या एका महिन्यातच या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यावरून या रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट होत आहे.
याच रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यात जाणे-येणे करतात, तसेच तेलंगणा राज्यातील बसेस याच मार्गावरून मार्गक्रमण करतात. डांबरीकरण केले. मात्र, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. अनेक ठिकाणी गिट्टी आणि चुरी उखडून पडली आहे.
वांगेपल्ली मार्गावर डांबर उखडल्याने असे खड्डे पडले आहेत.
बांधकाम विभागाचे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष
एका महिन्यापूर्वी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी या रस्त्याचे लोकार्पण केले होते. खडीकरण आणि डांबरीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी वेळोवेळी लक्ष का दिले नाही किंवा चांगले साहित्य वापरण्याचे सूचना कंत्राटदारास का देण्यात आल्या नाही, असाही प्रश्न निर्माण होत आहे.












