prabodhini news logo
Home गोंडपिपरी आत्मविश्वास आणि मेहनतीचा विजय – प्रणय संगीता देवेंद्र बांबोळे

आत्मविश्वास आणि मेहनतीचा विजय – प्रणय संगीता देवेंद्र बांबोळे

0
258

आय आय टी (IIT) गुवाहाटीचे पदवीधर

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – कर्तृत्वाच्या कळसावर झेप घेणारा आणि स्वप्नांना साकार करण्याचा निर्धार बाळगणारा एक युवक – प्रणय यांनी आपल्या बुद्धिमत्ता, चिकाटी आणि अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर देशातील नामांकित IIT गुवाहाटी येथून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवून गोंडपिपरी करांचा अभिमान वाढवला आहे.

गोंडपिपरी सारख्या एका छोट्याशा तालुक्यातून सुरू झालेला प्रणय यांचा शिक्षणप्रवास हा संघर्ष, संधी आणि सततच्या प्रयत्नांची एक प्रेरणादायी गाथा आहे. आर्थिक अडचणी, शिक्षणाच्या सुविधा नसणे, आणि ग्रामीण पार्श्वभूमी असतानाही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी जिद्दीची मशाल उंचावत दहावी 90/+, बारावी (90/+) उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. आणि देशातील अत्यंत कठीण JEE परीक्षा पहिल्या प्रयत्नात पार करून थेट IIT गुवाहाटीमध्ये प्रवेश मिळवला.

चार वर्षांचा प्रवास म्हणजे ज्ञानाच्या वाटेवरचा कठीण घाट. हा प्रवास केवळ शैक्षणिक नसून व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा होता. या काळात प्रणयने केमिकल इंजिनिअरिंग मध्ये गाढ अभ्यास करत प्रकल्प, प्रयोग आणि संशोधन यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली प्रणय यांनी अपार मेहनतीने आणि न थकता केलेल्या अभ्यासातून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यांच्या या यशामागे उभे आहेत त्यांचे प्रेरणास्थान – आई संगीता बांबोळे,वडील देवेंद्र बांबोळे या दोघांनी आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून, त्याला योग्य शिक्षणाची संधी दिली.

प्रणय यांचा हा यशस्वी प्रवास म्हणजे स्वप्नांना पंख देणाऱ्या इच्छाशक्तीची आणि कष्टांची सुंदर कहाणी आहे. पुढे संशोधन क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून समाजासाठी काहीतरी मौल्यवान देण्याची त्यांची तळमळ आहे.

प्रणय यांची वाटचाल ही संघर्षाची आणि स्वप्नांची गुंफलेली कहाणी आहे .ग्रामीण पार्श्वभूमी, अल्प संसाधने आणि या सगळ्या अडचणीवर आपल्या आत्मविश्वासाची आणि मेहनतीची तलवार चालवत त्यांनी हे यश सर केले आहे.आज प्रणय बांबोळे हे नाव केवळ पदवीधर युवकाचे नाही, तर ग्रामीण भारतातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोत बनले आहे. ज्यांच्याकडे साधनं नाहीत, पण स्वप्नं आहेत – त्यांच्यासाठी प्रणय यांची ही यशोगाथा आशेचा एक उजळ दीप आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here