prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – स्री जन्मा तुझी...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – स्री जन्मा तुझी कहाणी

0
92

ती स्री.
ती महिला.

ती आई.
ती सासू.

ती मुलगी.
ती बहिण.
ती नणंद.

ती पत्नी.
ती वहिनी.
ती भावजय.

ती शिक्षित.
घराकरीता सक्षम.
व्यावसायिक.

ती स्री.

‘आई’ हे तिचे रूप इथे विचारात घेऊन मी लिहीत आहे.

ती आईच.
पोटातील बाळाच्या स्पंदनाने त्याच्या आगमन आणि संगोपनाच्या आशांना पालवी फुलवणारी.

ती आईच.
मुलांना शिक्षित करण्यासाठी , सक्षम करण्यासाठी , स्वतःला पुन्हा शिक्षणाने सक्षम करत त्यांना शिकवू पाहणारी.

शिक्षणाचा वसा खेळकरपणे तर कधी शिक्षकांवर सोपवून, मुलांना देणारी.

ती आईच.(अर्थात वडीलांची तिला साथ लाभते.)
मुलांच्या वेदना स्वतःच साहू पाहणारी.

ती आईच.
मुलांच्या चुका,दोष त्यांना समजावून ते दोष घालवू पहाणारी.

समाजात मुलांना त्यांच्या सद्गुण ,कर्तृत्व यांनी स्थान मिळवून देऊ पहाणारी.

ती आईच.
मुलांचे मन जाणणारी.

ती आईच. मुले मागे राहिलेले किंवा त्यांतील कमतरता राहिलेले न साहू शकून वेळीच त्यांना मदत करून पुढे आणू पाहणारी.

ती आईच. मुलांचे मोठे होणे, वय वाढणे तिच्या पुढील मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी असलेली,मुलांना त्यांच्यातील सचोटी,सक्षमता ,कर्तृत्व यांची ओळख करुन देणारी.

मुलं मोठी झाली कि मुलांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून कधी जवळ तर कधी दूरही राहू पाहणारी.
मुलांची संसारवेल फुललेली बघायला तरसणारी.

नातवंड खेळवायला आसुसलेली.

नवर्‍याची मैत्रीण बनू पाहणारी.

सून, मुले,नातवंड,नवरा ,सासर यांचा विचार करत मनाच्या बागेत रमत असलेली.

ती स्रीच.
ती आईच.
सासूबाईंसाठी त्यांच्या वृद्धापकाळात आई बनून त्यांचे मुलांसारखे बनणे, अनुभवणारी.
सुश्रृषेचा मार्ग सहज आत्मसात करून ते अंगवळणी पाडून घेणारी.

ती स्रीच.
विविध रूपे तिची.
सहनशील, सक्षम,कणखर.

लेखिका डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे, ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here