
चेहऱ्यावर हसू डोळ्यात पाणी…
स्त्री जन्मा तुझी कहाणी…
जखम मनाची कोण जाणे
स्त्री जन्म, वेदनांचे गाणे.
शिक्षण, संघर्ष, तरीही
पुरुषी समाजाच्या फेऱ्यात हरणे.
नवरात्रीत दुर्गा मातेस पुजिती…
पण ह्या दुर्गेचा कायम होई छळ…
अन्याय सहन करुनी लेकरांस बघुनी तुझ्यात येई चार हत्तीचे बळ…
स्त्री म्हणजे करुनेचा, मायेचा सागर ह्यांच्या भावना कोणाला कळेल का????
गर्भात मुलगी मारली तर आता लग्नाला नवरी मिळेल का ???
अशी ही स्त्री
कधी हसते, कधी रडते…
जगण्याची लढाई लढते…
शिवप्रसाद शेळके
ओझर (मिग) ता. निफाड जि. नाशिक















