prabodhini news logo
Home गोवा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – श्रावण मास

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – श्रावण मास

0
83

“श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर हिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

बालकवीच्या कवितेतील या सुंदर ओळी.या कवितेतून श्रावण महिन्याचे सुंदर वर्णन कवीनी केले आहे.मुळात श्रावण महिना हा सुंदर व आल्हाददायक आहे.सृष्टीचा वरदहस्त लाभलेला हा महिना.या महिन्यात सगळीकडे हिरवेगार प्रसन्न वातावरण असते,उन पावसाचा खेळ चालतो.निसर्गाचे अनुपम सौंदर्य न्हाहाळावे ते श्रावण महिन्यात.
हा महिना आला की ओठ गुणगुणायला लागतात.

आया सावन आया सावन
बन बनमें नाचे मोर
छम छम बदरा बरस रहे है
झुला झुले राधा नंदकिशोर…

हा वर्षाचा पाचवा महिना आहे.याला उपवासाचा महिना असेही म्हणतात.श्रावण महिन्याचे अधिष्ठाता भगवान शिव आहेत.या महिन्यात अनेक सण येतात.कृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन,नारळी पौर्णिमा,नाग पंचमी, पुत्रदा एकादशी असे अनेक सण. गोडा धोडाची रेलचेलअसते. सोमवारी गव्हाची खीर, राखी पोर्णिमेला नारळीभात,नागपंचमीला उकड मोदक, कुष्णाष्टमीला दुध पोहे, दही पोहे अशी पंगत असते.सगळीकडे,भक्तीमय , आध्यात्मिक असे वातावरण असते.एकमेकांच्या घरी येणे जाणे होते.

या महिन्यात शिव पूजेचे फार महत्त्व आहे.सोमवारचे व्रत केले जाते.भक्तगण हरिद्वार, गंगोत्री धाम अशी यात्रा करतात.शिव पुराणानुसार असे मानले जाते की जो कोणी या महिन्यात सोमवारचे व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

कवींना भुरळ घालणारा , सृष्टीवर आनंदाची पखरण करणारा हा महिना. लहानपणी या श्रावण महिन्याची ओळख झाली ती एक आध्यात्मिक महिना म्हणून.आई या महिन्यात उपवास करायची. आईसोबत घर देव्हारा झाडणे,फुलवाती करणे,कुंकू,फुले,विडा,गुळखोबरे उदबत्ती, कापुर अशी तयारी करणे,सोमवारी शीवामुठ घालणे, मंगळवारी मंगळागौर जाणवणे, शुक्रवारी लक्ष्मी पूजा, व सणांचा सात्विक आनंद असे संस्कार झाले.व यामुळे साहजिकच या महिन्याशी भावनिक, धार्मिक नाते निर्माण झाले.

श्रावण महिन्याचे कौतुक हे वाटतेच.प्रफुल्लीत वातावरण, हिरवीगार सृष्टी,भक्तीमय वातावरण, भजनाचे सूर, पवित्र असा हा महिना म्हणजे इतर महिन्यांचा राजाच वाटतो..

गुलाब अनिल वेर्णेकर, गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here