prabodhini news logo
Home महाराष्ट्र प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – ‘श्रावण मास’

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – ‘श्रावण मास’

0
141

श्रावण मास हा आनंददायी आणि सुखकारक असा मनाला शांती देणारा आहे.अहो,कितीतरी सण या महिन्यात साजरे केले जातात.आणि होय,सर्वांनाच त्या त्या सणांची आवड अर्थातच गोडी आणि आठवणीत रमतात.तसेच बालकवींच्या मनातील भाव त्यांनी महिमा जणू आपल्या भाषेत व्यक्त केलेला आहे.हीच भावना जणू मनात घर करूनच आहे. खरंच

श्रावणमहिना आला की,’
श्रावण मासी हर्ष मानसी ,
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येती सरसर शिरवे,
क्षणात येती ऊन पसरे.

असा भाव अंतरीत हे गाणे गुणगुणायला आपोआपच।आपलं मन तयार होतं असत.श्रावण महिना म्हणजेच पावसाळा ऋतूच्या मध्यंतरी सुरू झालेला असतो.त्यातच शेतकरी एकतर पेरणी करून मोकळा झालेला असतो. म्हणजेच पिके बहरलेली असतात.सर्वत्रच नदी नाल्यांना पूर आलेला असतो. डोंगरदऱ्यातून पावसाच्या पाण्याने झुळझुळ वाहत असतात.पाऊसही आपल्याला तृप्त करूनच सोडत असतो.या पावसाच्या सरी प्रत्येक मनामनाला प्रत्यक्षात भिजवत असतात.
त्यातच काही हौशी पावसाळी सहलींचा आनंद घेण्यासाठी धबधबा सफर ठरवतात. आणि होय,त्यांत मनमुराद आनंद आणि आस्वाद घेत असतात.अशा पावसाळी सहलीत प्रवासात गाणी गाण्यात हसतखेळत दरी डोंगरातूनी वाट न्याहळत असतात.या सहली दरम्यान वनविहार करणे.धबधबाखाली नाचगान करून जरा भावनेला अधिकच उधाण आलेलं दिसून येत असते. यावेळी मित्र मंडळींसमवेत मुक्तपणे निसर्गाच्या सानिध्यात जणू निसर्गसोबत बोलत आहोत.असाच जवळजवळ भास होत असतो. जेव्हा हाच अनुभव आपण साऱ्यांनाच खूप काही प्रमाणात शिकवण देत असतो.
जेव्हा आपण निसर्गाच्या अधिकाधिक जवळीक साधतो.आणि होय,त्यातच नुकतीच आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी येऊन गेलेली असतांनाच अजूनही हरिनामाचा जयघोष आसमंत दुमदुमला आहेच.असाच भास होत असतो.कारण वाहणारे ओहळ ,नाले हेच आपणांस अनुभूती देत असतात. हेच चित्र अनुभवत असतो. हा जयघोष भक्त वारकरी पांडुरंग परमात्माच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो.त्याच पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात दरम्यान निसर्गाच्या कुशीत विसावलेले झरेच आपली वाट मोकळी करून भरधाव वेगाने उतारावरून वाहतांना आपणांस मनमोहक भक्तिमय संगीताची आठवण करून देत असतात.पृथ्वीच्या कुशीतील समस्त प्राणिमात्रांच्या आणि अन्य जीवास पावन करण्याचे काम पार पडलेले दिसून येत असते.
आपल्या मनातील भक्तीभाव तसाच द्विगुणीत किंबहुना जागृत व्हावा.अर्थातच व्रतवैकल्य,सेवाभाव वृत्तीत अधिकाधिक भर पडावी म्हणून श्रावण या महिन्याच आगमन झालेला आहे.असाच म्हणणं वावगे ठरणार नाही.काही ठिकाणी या महिन्यात यात्रा भरते.लहानमोठ्यांचा आनंद देणारा तो क्षण असतो.हा महिना मनातील हर्ष आणि आत्म्याला सदगती देणारा असतो.कारण यांत पोथी पुराण कथेतून अनेकविध सणांचे महत्व आणि इतर अध्यात्मिक गोष्टींचा भाव जागृत करण्याचं आयोजन केलेलं असते.काही ठिकाणी कथा,कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणे.भक्तीच्या शक्तीने काय करू शकतो. याचीच निश्चिती,निष्पत्ती आणि उत्पत्तीची नेमकी उकल लक्षात येत असते.म्हणूनच संस्कृती आणि सांस्कृतिक ठेवा यांची जपवणूक व्हावी.आणि होय,यातूनच संस्काराचे धडे आत्मसात करून तसे
वागण्याचा प्रयत्न आणि वर्तनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल. हीच आशा आणि अपेक्षा व्यक्त करूया!

शब्दांकन पुष्पमाला
श्री. शिवाजी किसन माळी.(गोरेगाव-मुंबई)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here