
डोंगरात वाहताना वारा
श्रावण संग झोका घेतो
शिखरावरून खाली मग
नदी दर्यात भुलतो.
वेली तरुंच्या पानांनाही
घेऊन उडतो आकाशी
खेळतो श्रावणाशी तो
तरी राहतो पाण्याविना कोरडा उपाशी
हा वारा वेगानी येतो
दव बिंदूंच्या स्पर्शानी वाहतो
श्रावण सरीत मिसळतो
क्षितिजा पलीकडे जाऊन धरणीत समावतो
श्रावणात बरसले पाऊस धो धो
नदी तळे ही भरून वाहले
किलबिल पक्ष्यांचे थवे ते
दूरवर कुठे पसार झाले
हृदय बघत राहिले ते दृश्य
प्रयत्न होता थांबण्याचा
श्रावणाने कट केला मोठा
सरित अश्रूंचे भिजण्याचा.
सौ.वर्षा साठे शिंत्रे, पणजी, गोवा















