
समाजाला घातक प्रथा व अंधश्रद्धा
आपण लहानपणी भाषा शिकतो. धर्म तर आपणास जन्मताच मिळतो, मायबोली प्रमाने हा माय धर्म असतो. लहानपणीच धर्म संस्कार म्हणूनच आपण स्विकारतो. धर्म विचार करण्याचा तिथे प्रश्न उपस्थित होत नाही . व्यक्ती पौढ होते विचार करण्याची विचार क्षमता वाढते, धर्माबरोबर स्वतः च्या माय धर्माची तो तुलना करू लागतो. तेव्हा धर्म विचाराला प्रारंभ होतो. बहुतेकांच्या जिवनात हे घडत नाही. बदलत्या वयोपरत्वे काही कर्मकांड धार्मिक वाचन तिर्थ यात्रा येवढेच घडते, व त्यानुसार मणुष्य त्यात रूढतो. धर्म संस्कार गडद होत जाते. मनाला समाधान देते. त्या त्या व्यक्तीला तीच बाब उचित व योग्य वाटते. स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचे एक मुख्य कारण तिच्या अज्ञानात आहे, स्त्री ही शिकून सज्ञान झाल्याशिवाय आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणिव तिला होणार नाही, मुलीचे शिक्षण हा प्राधाण्याचा विषय ठरतो. आजही मुलीचा विवाह तुलनेने लहान वयातच उरकला जातो त्यामुळे शिक्षणाची दारे आपोआपच बंद होतात . आत्मविकास व आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याची संधी तिला कधीच मिळत नाही स्वतंत्र निर्णय घेण्याचा साधाविचार सुद्धा तिच्या मनाला शिवत नाही.
मग हे दृष्ट चक्र भेदण्यासाठी लागणारे उच्च मनोधैर्य
तिच्या अंगी कुठून येणार, ही स्थिती बऱ्याच समाजामध्ये
आहे, परंतु केवळ शिक्षणानेही हा प्रश्न सुटत नाही . पती
हाच परमेश्वर, पती हेच स्त्रीचे सर्वस्व ही विचार सरणी
आजही मनावर वर्चस्व टिकवून आहे. दुसऱ्या बाजूला समाजातील सुशिक्षित स्त्री पुरूष देखील
विधवा विवाह अपवित्र मानतात. हे संस्कार घरीदारी
लहान पणापासून घट्टपणे रुजवला जाते.
विधवेचे विवाह हा घराण्याची अवनती समजली जाते.
त्याविषयी कोणताही पुर्ण विचार करण्याच्या मनस्थितीत
समाजातील सुशिक्षित वर्गही नसतो. प्रारब्धवादाचा पगडा
स्त्रीच्या मनावर बळकट असतोच. त्यामुळे आपले वैधव्य
हे ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ किंवा नियतीचा, दैवगतीचा
विचित्र खेळ समजते. ही मानसिक गुलामगिरी तिच्या मधे
मोठ्या खुशीने परंपरेच्या उदान्तीकरणाने तिच्यात रूजविल्या
जाते.
या संस्कारातून रूळी बळकट नाही होणार
तर नवलच , कुठल्याही समाजात स्त्रिया सर्वस्वाचा त्याग
करूण धर्मशिलतेचे त्या रक्षण व पालनच करत असतात.
सर्व आयुष्य एकाकी जगून मृत पती वरची निष्ठा व्यक्त
करतात अशी गौरवपूर्ण मखलाशी केली जाते. घराण्याची अब्रू व वर्णसंकर या दोन गोष्टीचे दाखलेही हमखास जोडली
जाते.या सर्वामध्ये शेकडो वर्षे उलटली तरी सामान्य माणूस
त्या भानगडीत पडत नाही.
खरंतर खाणदाणीचे संरक्षण असे जर काही असेल तर फक्त
स्त्रियांसाठीच का ? स्त्रियाच्याच आत्मत्यागावर का अवलंबून असते, ते कितपत योग्य आहे. पुर्णविवाह हा जर खानदानीचा
निकष असेल तर, पुरूष्याच्याही पुनविवाहाला प्रतिबंध का
नाही, विधवा बंदी हा सुचितेचा आग्रह आहे की पुरुषप्रधान
संस्कृतीमधली सोयीस्कर दुटप्पीपणा ?
जिवन स्वातंत्र्यावर प्रभावी बंदी आणून जपले जाणारे
तथाकथित पावित्र्य हे खरोखरच काही साध्य करते का ?
गेल्या शतकात ही दृष्ट रुळी, ब्राह्मण समाजालाही व्यापून
राहीली होती, आगरकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे, या सारख्या
समाज सुधारकांच्या कार्याने ब्राह्मण समाजाने आपल्या
चुका सुधारल्या. पुर्वी काही धर्म ग्रंथात उदारणार्थ —
स्कंदपुराणात यासंबंधी वचने आढळतात, विधवेला जितकी
केस असतील तितके वर्षे तिच्या पतीला नरकवास घडतो
अशा भ्रामक कल्पना प्रसुत केल्या गेल्या. विसाव्या शतकाच्या
सुरवातीला देखील . ही विटंबना स्त्रीयांना सहन करावी लागली
हे दारूण सत्य आहे, उच्च जाती मध्ये म्हणजे ब्राह्मण समाजात ही चाल प्रामुख्याने प्रचलित होती. मृत पतीच्या मृत्यूनंतर ही पतीचा तिच्यावर अधिकार असतो . या भ्रामक समजुती मुळे परलोकी तिने पतीची सेवा करावी ,व म्हणून देहत्याग करावा ,
ही भावना भारतीय समाजात तिव्र होती. त्यातून भारतामध्ये
मृत पतीच्या बरोबर सहगमन करण्याच्या अथवा सती जाण्याच्या चालीचा प्रचार झाला किंवा तिला पतीच्या
चितेवर जाळण्याचा जबरदस्ती प्रकार घडू लागले.
या प्रथेला जरी धार्मिक अधिष्ठान दिल्या गेले , पण कोणत्याही
धर्म ग्रंथात या प्रथेचा पुरस्कार नाही.
कनिष्ठ जातीतील ‘ पुनविवाहाला मोहतूर ‘ किंवा पाट लावणे
असे म्हणत, एकोणिसाव्या विसाव्या शतकात विधवा स्त्रीला तिचे हक्क प्रदान करणारे अनेक कायदे संमत झाले.
१९३७ मधे हिंदू स्त्रीयाच्या संपती विषयी अधिकाराचा अधिनियम मंजूर केला हिंदू विधवेचे कुटुंबावरील अवलंबित्व
त्यामुळे संपूष्टात आले .
पंरतु आजही काही काही समाजात
विधवेला पुनविवाहाला मान्यता नाही, जो समाज आपल्या
आचार विचारात बदल घडवतो, काळ ,वेळ परिस्थिती,
समस्येचे भान राखतो, तो समाज पुढे जातो, व यशस्वी होतो. समाजाने लादलेली शिकस्त म्हणजेच तु विधवा
आहेस तुला विधवेसारखं जगायचं आहे , हे आजही परंपरागत रितीने बऱ्याच समाजात दिसते. याला कारण
म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अज्ञान होय .
आता वळूया मानसिक अंधश्रद्धेकडे काही दिवसांपूर्वी पाहिलेला व्हिडिओ
साधूभोंदू महाराजांकडून महिलेला श्रध्देपोटी मारहाण
त्याचे शिर्षक होते .
हिच मारहाण नवऱ्याने केली असती तर……
साहजिकच आहे नसते सहन झाले तिला, कारण —
कायद्यानुसार तसे करणे गुन्हा आहे, हे आजकालच्या सर्व पुरूष स्त्रियांना माहिती आहे आणि तसे झालेही तर
स्त्रिया लगेच पोलीस स्टेशनला धाव घेतात . नवऱ्याने
छळ केला तर तो शारिरीक छळ असतो. बरे झाले बाबासाहेबाच्या कायद्यामुळे स्त्रियाना तेवढी तरी समज
आली . घरी सासू सासरे नवऱ्याने छळ केला तर घरघुती
हिंसाचार म्हणून पोलीस ठाण्यात नोंद केल्या जाते.
कारण….तिचा आत्मसन्मान तेव्हा जागा असतो ,मानसिक
किंवा शारीरिक छळ कोणाचा का म्हणून सहन करायचा
असं तीला मनातून वाटत असते, म्हणजेच गुलामीतत्व
तिला मान्य नसते.
पण विचार करण्याची क्षमता जेव्हा मरते व मन माणसिक
रोगी बनतं तेव्हा तिथेच खऱ्या अंधश्रद्धेची सुरूवात होते
मग साधु ,महाराज, बाबा , भोंदू जेव्हा मारहाण करतात
किंवा लैंगिक शोषण ही करतात तेव्हा तिचा अंतरात्मा
मेलेला असतो . मानसिक दृष्ट्या ती पांगळी झाली असते.
अंधश्रद्धेच भूत तिच्यावर इतकं स्वार होतं की कोणी चांगल
जरी सांगितले तर तिला व्यर्थ वाटायला लागते. म्हणून
माणसिक दृष्ट्या कधीही अपंग होऊ नये . शारीरिक
दृष्ट्या अपंग झाले तर त्यावर इलाज आहे, परंतु माणसिक
दृष्ट्या अपंगत्व आलं तर त्यावर इलाज नाही,
एकवेळ अंधश्रद्धेच्या खाईत गेलं तर तिथून सुटका नाही .
माणसाचे सर्वाधिक वेगळेपण म्हणजे ” विवेकबुद्धी ”
आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणाशी माणवासह अनेक
प्राणीमात्रांशी, निसर्गाशी कोणते वर्तण इष्ट ,रास्त, योग्य,
उपकारक आणि कोणते अनिष्ट अयोग्य अहितकारक याचे
भान माणूस बाळगतो, पण धर्मश्रद्धा ज्या वेळी अंधश्रद्धा
बनवली जाते, त्यावेळी हे भान सुटते, माणसाचा विवेकमुल्य
गमावला जातो, ही लागन समाजाला होते. समाज भ्रमिष्टसारखा आंधळेपणाने वागू लागतो. अशा अवस्थेत त्याच्या विरोधात समाजाने ब्र काढलेला ही आवडत नाही. विरोध करणे तर दुरच, अंधश्रद्धेचा पगडा असतोच तसा जबरदस्त. या मधे जास्तीत जास्त स्त्रिया अडकल्या असते
हे ती का करते यामागेही काही कारणे असतात .एकतर
ती त्या घरातील सुनवारी असल्याकारणाने कामाचा बोजा , त्यातून सुटका मिळविण्यासाठी, पती बाहेर ख्याली ,स्त्री लंपट असल्या कारणाने , घरातील कामे करायचे जिवावर आल्यामुळे,
किंवा मुले होत नसतील तर, देवाला प्रसन्न करण्यासाठी
देवाकडे किंवा भोंदू महाराजांकडे धाव घेतात ,अशिक्षित, सुशिक्षित स्त्रियाचीही ओढ असते, देवाच्या, किंवा महाराजांच्या मटावर घरच्या लोकांना कधी सांगून तर कधी न सांगता बाहेर पडतात व बाबा महाराज यांच्या शिकार होतात.
कित्येकदा असे प्रकरणे बाहेर येतात. पाचसहा वर्षापुर्वीच
घडलेले ताजे प्रकरण म्हणजे आसाराम, नारायण साई,
राम रहीम का सच्चा डेरा असे बरेचसे उदाहरणे आहेत
त्यात महिलाच असतात असे काहीही नाही तरूण तरूण
सुशिक्षित मुलं मुलीही असतात. अंधश्रद्धेच्या मायाजालात
फसणे सोपे आहे पण निघते कठीण.
या अंधश्रद्धेच्या मुळाशी लपलेले अज्ञान माणसाने शोधण्याचा
प्रयत्न केला तर, मणुष्य सुखी होतो परंतु नेमकं तेच आपल्या
बहुजनांना जमत नाही. एकतर ज्ञानाचा गंध नसतो , परिसर गाव, परिस्थिती, अज्ञान व देवावर असलेली श्रद्धा
आणि मुळात धर्म नावाची वस्तू अज्ञानामुळे त्यांना चैन पडू देत नाही. त्यामुळे बहूजन समाज कर्मकांड, भूतबाधा, ज्योतिष , भविष्य, भानामती, बुवा बाजी, फलज्योतिष, नरबळी, अंगारा धूपारा , मंत्रतंत्र, चमत्कार, या भोळसट कल्पनेला बळी पडतो. हा बहूजन समाजच बळी पडतो असे काही नाही त्यात जैन, ब्राह्मण, मुस्लिम यांची ही गणती कर्मकांडात आहे, परंतु बहूजन स्त्रिया अंगात येणे, घुमणे यात समोर आहे .
बाकीच्याचे कर्मकांड झाकलेले असतात. फरक इतकाच
ज्या प्रमाणे धर्माविषयी विषमतेची बिजे मना मनात
रूजली आहेत, धर्म आहे तोपर्यंत विषमता आहे.त्याप्रमाणे
कर्मकांडाचेही तसेच आहे, धर्म आहे तोपर्यंत कर्मकांड
चालत राहणार, कोणी कितीही अंधश्रद्धा निर्मूलन केले तरी
मन मस्तिष्कात असलेले अंधश्रद्धेचे किळे राहून राहून
चुळबुळ करणारच…….
अंधश्रद्धा कर्मकांड हे नाव वरवर जरी असलं तरी त्यातील
गुपित श्रध्दावान, वैज्ञानिक,तत्वज्ञानी, सुज्ञ व वैचारिक लोकांच्याही घरा घरात दडलं आहे , ह्या अंधश्रद्धा इतपत
मुरल्या आहेत आहेत की त्याची गणती कशात आणि कुठे
होईल सांगता येत नाही, समाज, जात , धर्म, वंशपरंपरागत
रूढी परंपरेने लाभलेला हा वसा कुणीही मागे सारायला
तयार नाही, मग ते विध्वतेच्या शिखरावर गेलेलं घरानं
किंवा धर्म समाज का असेना, तिथे अंधश्रद्धेची किड घर
करून सहीसलामत बसली आहे .
धर्म श्रध्देच्या नावावर तो अंधश्रद्धेत कितपत मुरलेला असतो , हे डोळसपणे तो,ती कधी पाहू शकत नाही,
एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर संस्कृती त्याला लगेच
टोकणार , काय ? ‘ कुठे निघालास ‘ खुप शिक्षण घेतलेस
बरेच पुस्तके ही वाचले असतील ना ? खुप तत्वज्ञानी
झालास, वंश परंपरेने लाभलेल्या संस्कृतीला सोडू पाहतो ,
‘ कुणा कुणाला शिकवणार आहेस तुझं तत्वज्ञान ‘
पुर्वी पासून या समाज धर्मावर माझी पकड मजबूत आहे
तु कर धडपड समाज धर्म बदलण्याची, पण ‘ मी खंबीर
आहे ‘ कारण…… माझं नाव संस्कृती आहे,
मी प्रत्येकाच्या मना मनात रूजली आहे, या देशावरच
नव्हे तर सर्व जगावर माझं वर्चस्व आहे, तु धर्म बुडवायला
निघालास, ‘ आजवरी तुझ्या पिढ्यानपिढ्या माझीच
तर गुणगान करत होता विसरलात ? तुझ्या ज्ञानाची किमया इतकी मोठी आहे का ? तु धर्म संस्कृतीशी
ओळख विसरू लागला. हजारो वर्षे तु माझी मोठ्या
मनाने गुलामी केलीस, पुर्वीची समाज व्यवस्था कोलमडू
नये म्हणून, आजवरी ज्या वाटेने चालत होता त्याच वाटेच्या पाऊलखुणा आज खोडायला लागला.
मग हा भ्रमीत झालेला मागे वळून पाहणार कशाला ,
करतोय हे आपण, समाजाला सावरायला आपण एकटा थोडी आहे असे , आज धर्मा धर्मात इतक्या अंधश्रद्धा आहेत
की पायाला दगडाची ठोकर जरी लागली तरी अंधश्रद्धेचा
जन्म होतो,
गॅसवर दुध उतू गेले अपशकुन, मांजर आडवी गेली अपशकुन,
घराचा दरवाजा कुठल्या दिशेला असावा, घरात मुर्ती कोण्या
दिशेला ठेवावी, कोण्या दिशेला पाय करून झोपावे,
गॅस किंवा चुलीचे तोंड कोण्या दिशेला असावे, बोर, किंवा
विहीर केल्यानंतर त्यात सोने चांदीचे कासव मासे करून
टाकावे , देवासमोर दिवा तेलाचा असावा की तुपाचा,
लग्नाचा मुहूर्त शनिवारी किंवा मंगळवारी नसावा
अशा खुप काही अंधश्रद्धा जन्माला येतात. त्यांना मुळीच
अर्थ नसतो पण चालू आहे त्या आपल्या मुळेच,
अशा अंधश्रद्धेमध्ये बायकांचा सहभाग जास्त असतो .
देव धर्माच्या अंधश्रद्धे बाबतच नाही तर अंगावरील
दागदागिन्याना सौभाग्याचे लेणं म्हणून भांगातील
कुंकवापासून तर पायातील जोडव्यापर्यत मोठ्या
श्रध्देने स्त्रिया जपत असतात . पुर्वी पासून चालत आलेला
रितीरिवाज म्हणून त्यात त्यांना कुठलाही कमी पणा
वाटत नाही. मग ती स्त्री सुशिक्षित असली तरी
तीचा सन्मान त्याच गोष्टीत पुर्णतः आहे अशी काहीशी
आम्हा स्त्रीयाची अवस्था असते.
अशा अंधश्रद्धा उपद्रवी असतील तर त्यावर व्यक्तीच्या
भल्यासाठीच कठोर प्रहार करावे लागते.
निरूपद्रवी असेल तर व्यक्तीची बुद्धी गहाण पडू नये म्हणून
यावर बाबासाहेब म्हणतात , ” खरा धर्म म्हणजे काय ” हे समजण्यासाठी धर्माला कस लावून पारखण्यात आलं पाहिजे,
ज्या प्रकारे आपण सोन्याचा दागिना खरेदी करण्यासाठी सोनारांच्या दुकानात जातो, तेव्हा सोने खरे की
खोटे हे समजण्यासाठी कसोटीवर त्या दागीण्याला कस लावून
पाहण्यात येतो , त्याशिवाय घेत नाही .
तसेच धर्माला कस लावून पारखता आले पाहिजे, जोपर्यंत
धर्माची अशी परिक्षा होत नाही, तोपर्यंत तो धर्म स्वीकारणीय
होत नाही. उलट अशा वेळगट कल्पनानी देश भिकेला लागू
शकतो. बाबासाहेबांचे हे बोल कुठपर्यंत पोहचेल माहिती नाही, परंतु धर्माला पारखण्याची खरी गरज स्त्रियाना
आहे. कारण स्त्रीही घराचा आधारस्तंभ आहे तिच्या
विचारावर अवघं घर उभं असतं घरातील स्त्री जर सत्य
धर्म न समजता कर्मकांड अंधश्रद्धेच्या मागे लागत असेल तर त्यातून स्त्रीची व कुटुंबाची कधीही सुटका नाही. एवढे मात्र नक्की……
नंदा बाबुराव भगत
कारंजा लाड जि. वाशिम















