prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सदाफुली

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सदाफुली

0
103

सदाफुली फुलतेय
सदाकाळ अंगणात
शुभ्र तिचा रंग वसे
मनाच्याच कोपऱ्यात

सुंदर अशी दिसणारी
देव्हार्‍याला करी सुशोभीत
भगवंताच्या चरणी जणू
राहतेच ती आनंदीत

सडा पडतो सदाफुलीचा
असतो एखाद्या सहलीप्रमाणे
सर्व फुले असतात वेगवेगळे
वाटतात एकाच परिवाराप्रमाणे

बहर फुलांचा येतोय छान
सुगंधरहित फुले असूनही
वाटतातच ती मनमोहक
झाडावरती हसती बसूनही

वर्षभर असे सदाफुली
फुलते ती सदोदित
सकाळी पाहून तिला मन
होते सदा अल्हादित

रंजना भैसारे, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here