
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. २३ – थोर स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रभक्त आणि समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात कार्यकारी अभियंता प्रकाश सासे, उप कार्यकारी अभियंता चेतना पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी मनोहर शेजवळ, तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून टिळकांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमादरम्यान लोकमान्य टिळकांचे राष्ट्रप्रेम, विचारधारा व सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली. अशा महापुरुषांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प या निमित्ताने अधिकाऱ्यांनी केला.












