prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – खारुताई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – खारुताई

0
111

खारुताई खारुताई
चालली कुठे घाई घाई
एक दोन तीन चार
म्हणत पर्यंत धावत जाई //१//

खारुताई छोटीशी
खेळणी सारखी वाटते
पकडायला गेले तर
लाजून दूरच पळते //२//

ये ना तुला चॉकलेट देते
माझी सारी खेळणी देते
खेळ ना ग माझ्याशी येऊन
मग मी तुला झुल्यात नेते //३//

तुझ्यासारखी धावेल मी
रनिंग मध्ये फर्स्ट येते
मिळालेल मेडल तुला
खारुताई गिफ्ट मी देते//४//

रंजना भैसारे, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here