
सागराच्या लाटा सम
मनात उठती स्पंदने
क्षणात उसळती, क्षणात विरती
पहाता राहते आनंदाने ||१||
नजरेत तुझ्या नजर मिळता
स्पंदने जागली माझ्या मनी
नकळत सखया तुझी जाहले
नाही कधी आले ध्यानी ||२||
प्रेम भावांची स्पंदने विखुरली
माझ्या मन अंगणी
शब्द फुलांच्या कवितेतून
गंधावली मन प्रांगणी ||३||
तुझा हात हाती घेता
स्पंदनांना मिळतो विसावा.
तुझा आश्वासक भाव सांगतो
हात तुझा हाती असावा ||४||
जीवन करीते गंधित
अनुभूतीचे स्पंदन
भावनांची शब्द फुले
होतात आनंद घन ||५||
सौ. अंजली गरगटे, पुणे.















