prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनातलं प्रेम

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनातलं प्रेम

0
104

मनातलं प्रेम कायम मनातचं राहिलं
तुझ्यासोबत जगायचं स्वप्न स्वप्नचं राहिलं ॥धृ॥

कधी दुसरं कोण नव्हत माझ्या मनात
तुचं वाटायची मला माझा आधार
सदैव माझ्यासोबत असायची
एक मैत्रीण,सखी म्हणुन धीर द्यायची..॥१॥

तु तु आणि फक्त तु जग माझं
नको कोणी दुसरं सुखं-दुःख तु माझं
माझ हसणं-रडणं हे ही तुचं माझं
माझं जगणं-मरणं पण तुचं माझं..॥२॥

प्रेम व्यक्त करता आलं नाही
माझं मला भान राहीलं नाही
मी तुला कधी परकं मानलं नाही
तुझ्याशिवाय कोणाचाचं विचार नाही..॥३॥

पण मैत्रीच रुपांतर कधी प्रेमात झालं
हेचं मला तुला कस सांगु समजलं नाही
मनातील प्रेम तुला सांगता आलं नाही
मनातील शब्द ओठावर कधी आले नाही..॥४॥

शुभम किरण गोरे
अकलूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here