prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – अबोल प्रीत

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – अबोल प्रीत

0
126

अबोल प्रीत तुझीच
सख्या आठवे मजला
धुंद प्रेमाचे ते दिवस
देई उभारी मनाला…१

मूक भावना प्रेमाची
नजर बोलकी झाली
हृदयाने हृदयाशी अशी
सख्या हितगुज केली….२

तुझी माझी प्रीत फुलली
भाव मनातले उलगडले
नकळत हास्य ओठांवर
अबोल प्रितीचे स्फुरले…३

हळूच तुला बघताना
गहिवर मनास आला
आठवले क्षण प्रितीचे
शब्द मुक्या भावनेला…४

असे गुंतले मी तुझ्यात
कळले न काही मला
गतकाळातील स्मृतींना
आज उजाळा मिळाला…५

सौ सरोज मते
दारव्हा यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here