
खारूताई तशी सर्वाच्या ओळखीची
ती जंगलात, झाडावर, वस्तीत राहते
तिचं देखणं रूप नटखटपणा चपळता
पाणीदार लाल डोळे, तपकिरी, पिवळे
अंगावर पट्टे व झुपकेदार शेपटी जमीन
झाडावर तुरूतुरू धावपळ मनाला भुरळ घालते त्यावरच आधारित आजची कविता……
खारूताई
नाव तुझं खारूताई, दिसतेस भारी नटखट
इकडून तिकडे झाडावर ,उतरते कशी झटपट
वागणं तुझ चपखळ ,तुला नाही कसली भिती
आताच होती झाडावर,अन् लगेच छपरावर ती
पाय मजबूत ,दिसाया देखणी, शेपटी झुपकेदार
तिष्ण दाताने कंद मुळे चाखते,फळं असे आहार
गवत, पाने, कापुस, धागे सामुग्रीने बांधते घरटे जन्मा घालते पिल्ले ,झाडाच्या ढोलीत, घरट्यामधे
तुला लाभलं आयुष्य तसं, उणंपुणं फक्तच बारा वर्ष
तुझं धावणं पळणं नटखट,चपळाईत कितीकच हर्ष
पिवळ्या रंगात देखणी , करडी तपकिरी पट्टेदार गुंजीसम लालबुंद डोळे, दाट मऊ केस अंगावर
झरझर चढते सरसर उतरते, अंगी तुझ्या चपळाई
तोंडात अन्नाची पिशवी, चित्त वेधक सुक्ष्म चतुराई
माळरान, झाडावर अरण्यात, कधी आढळते वस्तीत
तोल सांभाळण्या शेपटीचा आधार जबडाही मजबूत
भिरभिर फिरते कुठेही दडते ,अशी चपखळ गं फार ओळख तुझी जुनीच, म्हणती शेकरू,खारूताई,खार
नंदा भगत / कारंजा लाड
जि. वाशिम















