
प्रेम तिचे आणि माझे
जसे लाटा सागराचे
प्रेम शब्दातून वाढे
शब्द भासे अमृताचे….१
नजरेच्या कटाक्षाने
गालातली कळी खुले
स्मित हास्य ओठावरी
प्रेमातली घडी फुले….२
दोन क्षण दूर जाता
तारा विरह छेडती
अंतरीच्या हृदयाला
प्रेम व्यथांनी छळती….३
सांकेतिक शिळ येता
मनी बदलतो भाव
भेटीचीच व्याकुळता
घेई नजरेचा ठाव….४
स्वप्ने मनी एकांताची
लाटा सदा उंचावती
सांजवेळी,अबोल्याने
प्रेम धागे उजळती…..५
गोविंद शिवराम कुलकर्णी
नौपाडा, ठाणे















