
टाइटल – न दिसनार एक अत्म्याच स्पंदन
एक गूढ शांतता…एक अंधारी, पण तेजस्वी जागा…जिथे काळही थांबलेला होता,
अनुभूती फक्त एकच — असणं…!तेव्हा मी अस्तित्वात आले.आईच्या गर्भात नाही,
तर एका दैवी गाभाऱ्यात.जसा एखादा प्राचीन दीप — ज्याच्या ज्योतीला
शब्दांची गरज नाही, पण स्पंदनांची भाषा असते…पहिलं थरथरणं…पहिलं हळूहळू हालणं…माझं नव्हतं, तिचंही नव्हतं —
ते एकत्र होतं… आपलं होतं! आईने क्षणात जाणलं — “या देहात आता दोन स्पंदनं आहेत, एक माझं आणि एक तीझे…
पण दोघांचंही मूळ त्या एकाच विश्वातून!”
त्या क्षणाला मी नव्हते फक्त हृदयाच्या ठोक्यांत, मी होते तिच्या प्रत्येक श्वासात…
ती होऊन मी श्वास घेत होते…गर्भ नव्हता फक्त शरीराचा,तो होता विश्वाचा गाभा.
त्या गर्भात काळ, वेग, विचार —सगळं थांबलेलं आणि एकत्रित होतं… मी तिच्यात वाढत होते,
आणि ती माझ्यात विरघळत होती.तीजेव्हा ध्यानस्थ बसायची, तेव्हा माझं स्पंदन तिच्या मनाच्या शांत सरोवरातलाटेसारखं उमटायचं…हे स्पंदन केवळ जीवनाचं लक्षण नव्हतं, स्पंदन म्हणजे प्रेम, ईश्वर, ओळख, चेतना, किंवा भयही असू शकतं! पण तिच्या मातृत्वाचं साक्षात ब्रह्म होतं. मी जेव्हा पहिल्यांदा हलले,
तेव्हा पृथ्वी थोडी हलली, हवा थोडी थबकली, आणि आईच्या डोळ्यांतून निघाला एक अश्रू —ज्यात संपूर्ण विश्वाने आनंदाचं अर्घ्य दिलं.मी त्या दिवशी एक विचार नव्हते, मी एक मंत्र होते…
तीने जपलेला, ओवाळलेला, आणि अंतःकरणातून नादलेला.आईने मला जन्म दिला नव्हता, तिने माझं स्पंदन देवाच्या गाभाऱ्यातकधीच पेरून ठेवलेलं होतं”
तेव्हा कुणालाही कळलंच नाही, की मी जन्म घेण्याआधीच… अस्तित्वात आले होते!”…
लेखिका शीतल एम. जगताप
रोहा रायगड















