
सप्तपदी तुझ्या सवे
किती प्रेमाने चालले
अनेक वर्षे प्रीतीची
छातीवर विसावले
आनंदीत मी जीवनी
दुःखाला नाहीच थारा
तुझ्या मिठीत लाभला
मज प्रेमाचा उबारा
भार्या मी तुझी चारुता
तुझा हात माझ्या हाता
तुमची साथ असता
करु मी कशास चिंता
संकटे आली न् गेली
निष्ठा कधी न ढळली
एकमेकांचीच सावली
आयुष्याला गोडी आली
काय केले आम्ही पुण्य
दोघे भेटलो एकमेकां
जन्मभरासाठी सोबती
नक्कीच आहे बरं का
ठरले आहे ना आता
सोबतीच आम्ही आता
सात जन्मांचा विश्वास
हे मागणे भगवंता
नीला चित्रे
चिंचवड पुणे















