
कधी मिळते का अशी सोबत…
वाट चालण्यासाठी..
हातात हात नसले तरी..
साथ देण्यासाठी…
कधी उठतात का स्पंदन…
मनात कोणासाठी…
जवळ नसले तरी…
दिलासा देण्यासाठी…
कधी होतात का स्वप्ने पुरी…
पाहिली प्रेमासाठी…
जळली चिता तरी..
वाट पाही कोणासाठी…
कधी कळतात का स्पंदन…
आहेत कोणासाठी…
नाहीतर अपुरी रहातात…
जीवघेण्या एकांतासाठी…
आशालता भोसले
इंदापूर, पुणे















