
लिहावेसे वाटते खूप काही
वेळ मात्र मिळत नाही
शब्द आहेत आतूरलेले
कागद लेखणी शोधत राही
एक कविता त्याच्यासाठी
लिहिणार आहे ऊत्सुकतेने
स्पंदने मनीची जाणून
शब्दसुमने गुंफिन प्रेमाने
स्वप्न पाहिन जोडीने
त्याच्या प्रीतीत न्हावूनी
सुखावेन प्रियाच्या मिठीत
गर्द आमराईत बसुनी
त्याचे माझ्यासोबत असणे
मला नेहमी समजून घेणे
त्याची आश्वस्त नजर
माझे दिलखुलास हसणे
माझ्या चुकांना सावरणे
कौतुकाचे शब्द पेरणे
त्याला उत्तम जमते
खट्याळ डोळ्यांनी पाहणे
सौ. वंदना शशिकांत पाटील, मुंबई















