
दुर्मिळ दर्शन झाले
कृष्णा तुजसाठी
नजर लावून वाटेकडे
बसली राधा नदिकाठी
चिंतनात तुझ्या राहते
मन कासाविस होते
कान्हा तुझी मुरली
तनमनात गुणगुणते
तूझ्या वाचून करमेना
बांधले तुझ्या बंधनी
कधी भेटशील कान्हा
जीव गेला रे तरसूनी
राधा बावरी झाली
बासरीची धून मधुर
वाजवितो कान्हा पावा
ऐकण्यास होई अधुर
बंधने मनोमनीची
हृदयातील प्रांगणात
अधीर अंतरात्मा
तु दिप मी फुलवात
सौ. माधुरी नामदेव अमृतकार
सटाणा, नाशिक















