Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनातलं प्रेम

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनातलं प्रेम

0
117

मनात आहे एक नाव, ओठांवर येत नाही, अबोल प्रेम आहे माझं, कुणीच समजू शकत नाही.

स्वप्नात रोज भेटतेस तू, वास्तवात कधी येशील? मनातलं प्रेम आहे तुझं, कधीतरी व्यक्त होशील?

तुझ्या आठवांचा सुगंध,माझ्या श्वासात दरवळतो
अबोल प्रेम आहे माझं, तुझ्याचसाठी झुरतो.

सगळ्यांनाच आपलं प्रेम मिळतं हे नसतं खरं….
अरेंज सुद्धा लव्ह मानून सुखी व्हायचं बरं….

खरं प्रेम कोणाला मिळत नाही….
आणि खऱ्या प्रेमाचा अर्थही कोणाला कळत नाही….

मी पण प्रेम केलंय कुणावर ते दिवस नक्कीच होते छान….
काय नाव घेऊ तिचं ते होतं माझ्या आयुष्यातलं लपलेलं पान..

ती आता आपली होणार नाही ती हे मनोमनी जानतो….
आणि तिच्या आनंदात मी माझा आनंद मानतो…

शिवप्रसाद शेळके
ओझर (मिग)
ता. निफाड जि. नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here