prabodhini news logo
Home अमरावती आम्ही सिद्ध लेखिका अमरावती यांच्या वतीने ऑनलाइन कवी संमेलन आयोजित

आम्ही सिद्ध लेखिका अमरावती यांच्या वतीने ऑनलाइन कवी संमेलन आयोजित

0
231

अमरावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आम्ही सिद्ध लेखिका अमरावती जिल्हाध्यक्ष शारदा मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आणि मातृ पूजन या दिनानिमित्त दिनांक 13/7/2025 रोजी ऑनलाइन कवी संमेलन आयोजित केले होते संमेलनाची वेळ रात्री 8 ते 10 वाजे पर्यंत ठेवण्यात आली होती.
या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी स्वाती टोपले कोषाध्यक्ष या होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मृदुला पाट खेडकर आणि विदर्भ प्रमुख कविता कठाणे या होत्या. राज्यप्रमुख आदरणीय पद्माताई होशिंग यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवल्या होत्या. दीप प्रज्वलन करून आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्वाती टोपले यांनी त्यांच्या मनोगतातून सर्व कवितांचा सारांश सांगितला. आरती नागपुरे यांनी सुंदर सूत्र संचालन केले. मृदुला पाटखेडकर यांनी देखील मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

हे काव्य संमेलन अतिशय आनंदात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडले सर्व कवियत्रींनी आपल्या काव्य रचनेतून गुरूंना आणि आईला वंदन करून आई आणि गुरु यांच्या प्रति वृत्तज्ञता व्यक्त केली.
सर्वांच्या सहकार्यातून हे ऑनलाइन कवी संमेलन उत्तमरीत्या चैतन्यमय वातावरणात उत्साहाने पार पडले.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कवयित्रींची नावे. शारदा मालपाणी, सुलभा गोगरकर, आरती नागपुरे, स्वाती टोपले, अनिता वडतकर, मृदुला पाटखेडकर, वनमाला बोहरूपी, अर्चना वऱ्हाडपांडे, स्मिता बुल, सरला काळे, वैशाली चांदेकर, ज्योती देशपांडे, रेखा देशमुख, सारिका लाठकर यांनी सहभाग घेतला होता.
अशा रीतीने ऑनलाइन कवी संमेलनाचा कार्यक्रम आनंदाने पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष शारदा मालपाणी आणि समस्त कार्यकारिणी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here