
मनातलं प्रेम.. किती सांगू याविषयी, भरभरून बोलायचं ते काय कमीच पडेल शब्द. ती कविता सहज आठवून जाते प्रेम म्हणजे प्रेम असतं.. प्रेमाला कितीतरी उपमा दिल्याय कितीतरी जणांनी.. मनातल प्रेम खूप भाऊक असतं, खूप भक्तीमय, खूप नाजूक असतं, खूप रसा तळाला जाऊन केलेले असतं. मनातलं प्रेम फक्त एखादा व्यक्ती वरती करता येत नाही तर आपल्याच रोजच्या जगण्यावरती, आपल्या श्वासावरती, या देहावरती या भगवंतावरती आणि या संसारावरती केलं जातं, मनात फक्त जागा असायला पाहिजे प्रेमाला.. मग ते आपोआप घडून येतं.. त्याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपली इच्छा.. मार्ग आपोआप मिळत जातात. प्रेम स्पुरायला ती व्यक्ती प्रेमळ असावी लागते असेही नाही अगदी कठोर निर्दयी व्यक्तीच्या मनात सुद्धा प्रेम भावना उमलून निघतात अशीच आहे ही प्रेमाची दिव्यशक्ती. प्रेम हे अमर असतं.. त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही.त्याचा नाश करू शकत नाही,आपल्या मनाची शक्ती मोठी असते,जस मन नाजूक,संवेदनशील तस ह्यात आलेले विचार, कल्पना एखाद्याविषयीच्या आकर्षणाला खतपाणी घालतात..आणि मग तयार होते ति मालिका जिथ जुळवून आणले जातात योग..
भगवंत वेळोवेळी तपासत असतो तुमच्या विशिष्ट भावना आणि मग तुम्ही केलेल्या कर्मानुसार ठरते तुमच प्रारब्ध..,प्रेम ही एक दिव्य शक्ती आहे,आंधळाही प्रेम करतो..प्रेम अबोल असतं ते व्यक्त झाले पाहिजे असेही नसतं,ते एका ऊर्जेतून दुसर्या ऊर्जेवर प्रकट होतं ते काल्पनिक असलं तरी बरचं लोकप्रिय होतं ..प्रेमात वासना येतात तेव्हा ते हिंसक होतं आणि अपयशी ठरतं..
भक्ती केंजळे
सोमेश्वर















