
क्षणिक सुख दारूपिल्याने
आयुष्य हरवत त्याच सुखाने
घर नाती आरोग्य दुर जाती
श्वास मग तो नकळत थांबती.
आपल्या समाजासमोर ऊभं असलेलं गंभीर संकट म्हणजे ते व्यक्तीला लागलेलं दारूच व्यसन. दारूचं व्यसन हे पुर्वी काही वर्गापुरतच मर्यादीत असायचं.पण आज आपणं बघीतलं तर त्या व्यसनाने शहर,गाव,शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत अशा सर्वच वर्गात उंच उडी मारली आहे. दारूचं व्यसन हे फक्त एका व्यक्तीचं नुकसान करत नाही तर तो संपूर्ण समाजावर आणि कुटुंबावर त्याचा दुष्परिणाम होतो. या व्यसनाने मानसाचे शरीर कमकुवत बनते.शारीरीकदृष्टया यकृत, अपचन,उच्च रक्तदाब,
मानसिक नौराश्य,चिडचिडेपणा, स्मृतीभ्रंश अशा अनेक आजारांना व्यक्ती बळी पडतो व शारीरिक अवयवांवर या व्यसनाचा वाईट परिणाम होऊन शारीरिक अपंगत्व येण्याची शक्यता असते.आणि या परिणामामुळे व्यसनाधीन व्यक्ती आपलं जीवन संपवतो.
दारूच्या आहारी जाणाऱ्या व्यक्तीची निर्णयक्षमता कमी होते, कुटुंबाकडे दुर्लक्ष होते,आर्थिक परिस्थिती खालावते,कुटुंबातील लोकांचा आदर नसते,त्यांची कदर नसते,स्वतःचा स्वाभिमान विकल्या जातो,पती-पत्नी मधील विश्वास कमी होतो.नात्यात ताणतणाव वाढतो.आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घटस्फोट होताना दिसून येतो.कधीकाळी हिंसाचार, बलात्कार,भांडण,संतुलन अनियमित, विचारशक्ती,या बाबींना समोर जावं लागते. समाजात कुटुंबात व्यसनाधीन व्यक्तीची प्रतिमा कमी होते. यासारखे अनेक प्रसंग व्यसनाधीनता असलेल्या व्यक्ती च्या वाट्याला उद्वभवतांना दिसून येतात.
दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचं घरात वागणं हे आक्रमक असते.त्या घरातील सदस्य भीतीच्या वातावरणात वावरत असतात.म्हणून त्या एका व्यक्तीमुळे त्याचे आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आयुष्य अंधकारमय होते. घरातील मुलांवर त्याचा फार मोठा वाईट परिणाम होतो.घरच्या रोजच्या वातावरणात वावरताना मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होऊन अनेकवेळी आर्थिक अडथळे निर्माण होत असतात. त्याच बरोबर मुलांच्या मानसिक वाढीवरही परिणाम दिसून येतो.
अशा व्यक्तीची अवस्था एखाद्या रोग्यासारखी होत असते. दारूचं व्यसन हे केवळं एक व्यसन नाही, एक पेय नाही तर,जीवघेणी सवय आहे.व्यक्तीला जळलेला हा गंभीर आजार आहे. या आजाराशी लढण्यासाठी सामाजिक जाणीव, वैद्यकीय मदत,मानसिक आधार आणि स्वतः च्या मनाची तयारी असणे आवश्यक असते.अन्यथा संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होऊ शकते.म्हणून या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी वेळेत लक्ष देणं फार फार गरजेच आहे.
दारूपासून दुर रहा
आयुष्याकडे प्रेमाने पहा.
संगीता बोरकर- बांबोळे
गोंडपिपरी, चंद्रपूर















