
विकलांग सेवा व आनंदयात्रीचा सहभाग
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – दिव्यांग, वंचित उपेक्षित शोषित पीडितसाठी आपल्या कल्पकतेचा अभ्यासाचा व मांडणी कौशल्यामुळे शासनाच्या व व्यक्तिशः विविध योजना खेचून आणणारे संसदपटू व इतर बहुमान लाभलेले बल्लारपूरचे जन प्रतिनिधी असूनही महाराष्ट्रातील जनतेचा आवाज बुलंद करणारे कर्तबगार आमदार डाँ श्री. सुधीर मुनगंटीवार ह्याचा वाढदिवस अन्न दान, वृक्षारोपण, सॅनिटरी नेपकिन वितरण व वस्त्रवितरण उपक्रमाने साजरा करण्यात आला.
उपक्रम यशस्वीतेसाठी सिंगापूर स्थित आम्रपाली देवगडे पाटील,म. राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापक संजय डाखोरे,चंद्रपूरच्या कीर्ती राऊळकर निकोडे अमरावतीच्या सौदंर्य स्पर्धा गाजवीणाऱ्या शीतल बावणे ह्यांनी आर्थिक सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते गुणवन्त कामगार अशोकराव बिहाडे, देवरावजी कोंडेकर, जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर उपस्थित होते. तर कार्यक्रम सफल करण्यासाठी नंदा बिहाडे,शोभा खोडके, राजश्री शिंदे, सीमा दुपारे, पूजा चहारे, सुनंदा पान्हेरकर, किशोर, खुशाल ठलाल ,प्रियंका गावंडे साव परिश्रम घेतलेत.















