prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे भव्य स्वागत

ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे भव्य स्वागत

0
240

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपुरी – महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मा. शिवराज मोरे यांचे ब्रम्हपुरी शहरात आज उत्साहात स्वागत करण्यात आले. युवक तालुकाध्यक्ष प्रभाकर नाकतोडे, युवक शहराध्यक्ष सुरज मेश्राम, वकार खान, रवींद्र पारधी, ॲड. आशिष गोंडाने, रवी भाऊ पवार, चोकेश्वर भरडकर यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन व घोषणाबाजीने त्यांचे जोरदार स्वागत केले.

या स्वागतप्रसंगी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, प्रदेश महासचिव रमीज़ शेख, प्रदेश महासचिव अक्षय हेटे यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की, “युवकांच्या समस्या समजून घेऊन त्यासाठी संघर्ष करण्यासाठी युवक काँग्रेस कटिबद्ध आहे. महाराष्ट्रात युवकांना राजकारणात सक्रीय सहभाग देण्यासाठी आम्ही अधिक प्रभावीपणे काम करणार आहोत.”

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. युवक काँग्रेसच्या विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here